"आजीची कढई आणि हमखास जमणारे पदार्थ"
Wednesday, July 23, 2025
"आजीची कढई आणि हमखास जमणारे पदार्थ"
Tuesday, July 22, 2025
वरणफळं पार्टी
वरणफळं पार्टी
रागी व्होलव्हीट मफीन्स
शाळा सुरू.. डब्बा सुरू..प्रयोग सुरू
Tuesday, June 22, 2021
दाल बाटी
दाल बाटी
हा खास राजस्थानी प्रकार. खरतर ऑथेंटीक दालबाटी कशी लागते हे मी कधीच खाउन बघितलं नाहिये. पण दालबाटी आवडणारे लोक त्याचं कौतुक करताना थकत नाहीत म्हणुन बरेच दिवसांपासुन या प्रकार खाउन बघायची उत्सुकता होती.राजस्थान ची दाल बाटी, मध्यप्रदेश चे दाल बाफले, विदर्भातली वरण बट्टी हे सगळे भाउबंदच असं रेसिपी वाचताना लक्षात आलं.पण एकंदर कृती बघाता निखार्यावर भाजल्या जाणार्या या बाटी बद्दल जास्त उत्सुकता होती.
गेल्या लॉकडाउन मधे कराड मधे असताना आमच्याकडे पोळ्या करायला अनुराधा ताई नावाच्या एक गुजराथी मावशी यायच्या. कराड मधे खरतर खुप कडक लॉकडाउन चालु होता आणि ब्रेड,लादीपाव, पिझ्झा बेस,पाणीपुरीच्या पुर्या,भेळेच्या चटण्या, यीस्ट, क्रीम, चीज असे लक्झरी पदार्थ त्यावेळी तिथे अजिबात मिळत नव्हते.रोज रोज पोळी भाजी खाउन खाउन कंटाळा आलेला. फार फार तर इडली डोसे, भजी किंवा वडे.आणि इकडे पुण्यात लोक केक, बिस्किट, पाणीपुर्या, डाल्गोना कॉफ्या वगैरे चे फोटो रोज स्टेट्स ला टाकुन काव आणत होते.
तर या अनुराधा ताईंना एक दिवस सहज म्हटलं की वैताग आलाय पोळी भाजी खाउन काहीतरी वेगळं खायचय. त्यांनी विचारलं की मी तुम्हाला दालबाटी करुन देउ का ? कशी लागते माहित नाही पण थोड्या साशंक मनाने होकार दिला. त्यांच्या नॉनस्टॉप कॉमेंटरी सोबत ती दाल बाटी कशी बनते हे पाहिलं. त्यांनी बाट्या आप्पे पात्रात बनवल्या होत्या.
" तुम्ही किती नशीबवान बघा की ताई, तुम्हाला मी भेटले आता या लॉकडाउन मधे कामाला" असं त्यांच एक बेस्ट वाक्य मी आयुष्यात विसरणार नाही. अशी स्वत: वर खुश असलेली माणसं आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी समाधानी असतात.
तर या दाल बाटी ची प्रेरणा अनुराधा ताई आहेत. रेसिपी मी अनुराधा ताई + इंटरनेट वरच्या काही अजुन रेसिपी अशी मिक्स केली आहे.
साहित्यः
बाटी:
२ वाट्या कणीक
३/४ वाटी रवा
१ चमचा दही
१/२ वाटी तुप ( हो वाटीच )
१ चिमुट सोडा
१ चमचा ओवा
चवीनुसार मीठ
दाल:
१ वाटी तूरडाळ
१/४ वाटी मूगडाळ
१/४ वाटी मसुरडाळ
१/४ वाटी हरभराडाळ
१ उभा चिरुन कांदा
१ छोटा चिरलेला टोमॅटो
१ तमालपत्र
२ लवंगा
३-४ मिरे
२ चमचे बारीक चिरलेला लसुण
१ चमचा खिसलेलं आलं
२ उभ्या चिरुन हिरव्या मिरच्या
जिरे, कढिपत्ता, हिंग, हळद,मीठ, लाल तिखट्,कोथिंबीर
तेल्/तूप मिक्स ( संपुर्ण तूप पण छानच लागेल :-) )
गरम मसाला १/२ टीस्पुन
कृती :
बाटी -
बाटी साठी दिलेले सर्व साहित्य हाताने व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. सर्व एकत्र केले की या पिठाचा मुटका झाला पाहिजे इतके तूप लागेल.(दिवाळीतल्या करंजीचे पीठ भिजवताना करतो तसे. ज्यांनी कधी करंज्या केल्या नाहियेत त्यांनी आपापल्या आई-आजी ला मुटका म्हणजे काय ते विचारा ) तूपात कंजुषी करु नये नाहितर बाटी चा अपेक्षित खुसखुशीतपणा साधला जात नाही.गरजेपुरते पाणी घालुन घट्ट मळुन घ्यावे आणि अर्धा तास झाकुन ठेवावे.
( रवा जाड असेल तर किंचीत जास्त पाणी घालुन मळावे आणि तासभर मुरु द्यावे.)
तासाभराने परत एक-दोन मिनिटे हे पीठ छानपैकी एकत्र मळुन घ्यावे आणि त्याचे लिंबाएकढे गोळे करावेत. गोळे करताना थोडे ओबडधोबड, चिरा राहतील असे करावे.
खुप गुळगुळीत नको. असे केल्याने बाटी आतपर्यंत मस्त बेक होते.
ओव्हन कन्व्हेक्शन मोड वर १८० डीग्री ला प्रीहीट करुन घ्यावा. आता सगळ्यात उंच रॅक अथवा बेकींग डीश मधे बाट्या मांडुन १८० डीग्रीवरती वरतीच २० मिनिटे बेक करावे. वरुन छान खरपुस तपकिरी रंग आला असेल. आता बाटी उलटुन परत १० मिनिटे सेम सेटींग वर बेक करावे.
बाट्या तयार.
दाल -
सर्व डाळी एकत्र करुन १/२ तास पाण्यात भिजवुन ठेवाव्यात. त्यात मीठ, हिंग, हळद, चिरलेला कांदा, टोमॅटो घालुन कुकर मधे मौसुत शिजवुन घ्यावे.
कढई मधे तूप्/तेल एकत्र करुन त्यात जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, लसुन, मिरच्या, कढिपत्ता ची फोडणी करुन डाळ त्यात ओतावी.
खुप दाट वाटत असेल तर थोडे पाणी घालुन उकळी काढावी.

आता सगळ्यात चवदार आणि महत्वाचा भाग -
तुपाचा तडका -
३-४ चमचे साजुक तूप गरम करुन त्यात १/२ चमचा लाल तिखट घालावे आणि लगेच गॅस बंद करावा.
वाढणी -
खरतर ही भाजलेली बाटी असते तिला खाली उतरल्यावर तुपात अंघोळ घालायची असते म्हणे. पण माझं काही एकढ धाडस नाही झालं :-)
तर बाउल मधे २ बाट्या घेऊन त्यावर पातळ केलेले साजुक तूप घालावे. त्यावर गरम डाळ आणि वरुन तुपाचा तडका २ चमचे घाला.
गरम गरम आस्वाद घ्यावा.
Saturday, March 13, 2021
चिकन सुके/मसाला + रस्सा
मी ही रेसिपी जशी शिकले तशी स्टेप बाय स्टेप देते आहे.
मला अशी करायला आणि सांगायला पण सोपे वाटतेय.
त्यामुळे त्या त्या स्टेप मध्ये साहित्य लिहिलेले आहे
चिकन मॅरीनेशन -
चिकन 1/2 kg छोटे तुकडे
आले लसूण पेस्ट 2 चमचे
हळद 1/2 चमचा
लाल तिखट एक चमचा
मीठ 1/2 चमचा
चिकन ला सर्व मसाला चोळून 1 तास मॅरीनेट करून ठेवावे.
चिकन रस्सा -
1 मध्यम कांदा बारीक चिरलेला
खडा मसाला ( 2-3 लवंगा, 4 काळीमिरी , 1 तुकडा दालचिनी, 1 चक्रफुल , शाहाजीरे, 1 तमालपत्र )
सुके खोबरे खिसून भाजून 1/2 वाटी
कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा
संडे मसाला / चिकन मसाला 1 चमचा
तेल 2-3 चमचे
मीठ
तिखट गरजेनुसार (मॅरीनेट करताना आधी घातलं आहे हे लक्षात ठेवून)
गरम पाणी
पातेल्यात तेल तापवून खडा मसाला आणि कांदा परतावा.
त्यात मॅरीनेट केलेले चिकन घालून मोठ्या आचेवर 2 मिनिटे परतावे.
चिकन बुडेल आणि वर एक पेर राहील इतके गरम पाणी घालून बारीक गॅस वर चिकन शिजवायला ठेवावे.
20-25 मिनिटात चिकन शिजते.
गॅस बंद करून झाकण घालून 10-15 मिनिटे मुरायला ठेवावे.
आता चिकन चे तुकडे बाजूला काढून घ्यावेत. ( हे आपल्याला चिकन मसाला करताना वापरायचे आहेत )
एखादा बोनी पीस रस्स्यात तसाच राहुद्यावा.
आता हा रस्सा परत बारीक गॅस वर उकळायला ठेवावा. त्यात कांदा लसूण मसाला, चिकन मसाला आणि लागेल तसे मीठ घालावे.
यामध्ये भाजलेले खोबरे हाताने कुस्करून घालावे.
(खोबरे खमंग भाजून गार झाले की हाताने एकदम बारीक कुस्करता येते. मिक्सर ची गरज नाही. यामुळे रस्सा मध्ये इतर कोणतेही वाटण घालावे लागत नाही. )
व्यवस्थित उकळू द्यावे.
रस्सा तयार आहे.
वरून कोथिंबीर पेरावी ई ई ..
चिकन मसाला बनवता बनवता 1 वाटी भर रस्सा पिऊन घ्यावा. मसाला बनवायला अजून उत्साह येतो 
चिकन मसाला -
2 कांदे उभे चिरून
1 टोमॅटो
2 चमचे सुके खोबरे
5-6 लसूण पाकळ्या
1/2 इंच आले
कांदा लसूण मसाला 1-1.5 चमचा
संडे मसाला / चिकन मसाला 1 चमचा
हळद
धने जिरे पूड 1 चमचा
मीठ,तिखट चवी प्रमाणे
तेल पाव ते अर्धी वाटी
कांदा, खोबरे, टोमॅटो 1 चमचा तेलावर खमंग परतून घ्यावेत.त्यात आले लसूण घालून बारीक वाटण करून घ्यावे.
तेल तापवून त्यात वाटण घालावे.
त्यात मसाले आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
मसाल्याला तेल सुटले की शिजवलेले चिकन चे पिसेस त्यात घालावे. त्यात एक डाव तयार रस्सा घालून 2/3 मिनिटे परतावे.चिकन मसाला तयार आहे.
चिकन मसाला, रस्सा , गरम पोळी, आणि तूप घातलेला इंद्रायणी भात अशा छान मेनू वर ताव मारावा.
आमच्याकडे सगळ्यांना हा गरम गरम रस्सा प्यायला फार आवडते.
चिकन चा सगळा अर्क उतरलेला हा गरमागरम रस्सा आणि भात म्हणजे सुख..
Monday, June 22, 2015
मश्रुम आचारी टिक्का
साहित्यः
१२-१५ मध्यम आकाराचे बटन मश्रुम्स
१ कांदा चौकोनी चिरुन
१ ढ्बु मिरची चौकोनी चिरुन
१ टोमॅटो चौकोनी चिरुन
२-३ चमचे घट्ट दही
१-२ चमचे डाळीचे पीठ ( भाजलेले असेल तर उत्तम. मी तसेच वापरले )
२ चमचे आलं-लसुण पेस्ट
२ चमचे केप्र किंवा तत्सम लोणचे मसाला. ( मी केप्र चा वापरला होता )
१/२ चीज क्युब खिसुन ( ऐच्छीक - मी नव्हती घातली )
१/२ चमचा कसूरी मेथी
१/२ चमचा साखर
१ चमचा लाल तिखट
मीठ, हळद, तेल
बांबु स्क्युअर्स कींवा लोखंडी सळ्या ग्रील करण्यासाठी.
किंवा काहीच नसले तरी हरकत नाही. :-)
सॅलड साठी :
१ कांदा उभा पातळ चिरुन
१ टोमॅटो उभा पातळ चिरुन
मीठ, तिखट, लिंबूरस
कृती :
१. प्रथम मश्रुम्स स्वच्छ कापडाने नीट पुसुन घावेत. मश्रुम्स कधीही धुवुन घेउन नयेत त्यांना खुप पाणी सुटतं आणी ते मऊ पडतात.मश्रुम्स ना खुप माती असेल तर एखादा स्वच्छ न वापरलेल्या टूथब्रश ने हलक्या हाताने साफ करुन घ्यावेत.देठ तसेच राहु द्यावेत.
२. कांदा, आणि ढबु मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत.टोमॅटो च्या मधल्या बिया काढुन त्याचे पण मोठे तुकडे करुन घ्यावेत.
३. एका बाउल मद्धे दही, डाळीचे पीठ, आलं-लसुण पेस्ट, लोणच्याचा मसाला, कसुरी मेथी, साखर, तिखट, मीठ, हळद, चीज ईत्यादी सर्व मॅरीनेशन चे साहित्य घेउन नीट एकत्र करावे.
४. हे मॅरीनेशन मश्रुम्स, कांदा आणि ढबु मिरची च्या तुकड्यांना सर्व बाजुनी लागेल असे चोळावे. २०-२५ मिनीट्स फ्रीज मद्धे.( फ्रीजर नव्हे) झाकून ठेवावे. ३० मिनिट्स पेक्षा जास्त वेळ ठेवु नये.
५. बांबु स्क्युअर्स किंवा लोखंडी सळी वर आधी कांद्याचा तुकडा, मग टोमॅटो तुकडा खुपसुन घ्यावा. मग त्यावर मश्रुम देठाकडुन खुपसावे. मग त्यावर ढबु चा तुकडा खुप्सुन घ्यावा. मग परत कांदा, टोमॅटो, मश्रुम आणि ढबु असे अल्टरनेट खुपसुन घ्यावे.
६. आता तवा गरम करुन त्यावर एक चमचा तेल सोडावे आणि त्यावर या सळ्या/स्क्युअर्स अलगद ठेवावे.गोल गोल फिरवत सगळीकडुन नीट भाजुन घ्यावे.गॅस ची आच मध्यम असावी म्हणजे करपणार नाही व नीट भाजले जातील.
७. तंदुर ईफेक्ट येण्यासाठी डायरेक्ट गॅस च्या फ्लेम वर काही मिनिटे भाजावे.
८. सॅलड साठी दिलेले साहित्य एकत्र करुन सॅलड करुन घ्यावे.
९ गरमगरम मश्रुम टीक्का, सॅलड आणि लिंबाच्या फोडीसोबत सादर करावे आणि घरच्याची शाबासकी मिळवावी :-)
टीपा :-
१. लोणचे मसाला घालायच्या ऐवाजी गरम मसाला/ तंदूर मसाला देखिल छान लागतो.सोबत धणे-जीरे पूड घालावी.
२. बांबु स्क्युअर्स कींवा लोखंडी सळ्या नसतील तर नॉनस्टील पॅन वर मश्रुन एकमेकांपासुन अंतर सोडुन मांडुन घ्यावे व शॅलो फ्राय करुन घ्यावे.
३. पनीर किंवा चिकन किंवा बटाटे वापरुन हीच कृती करता येइल पण बटाटे आधी थोडे शिजवुन घ्यावे लागतील
माहितीचा स्त्रोत :
आंतजालावरील ब्लॉग्स आणि काही रेसिपी बुक्स.
Thursday, May 28, 2015
(क्रीमशिवाय) क्रीम ऑफ पालक सुप ;-)
फार पाल्हळ न लावता कृतीकडे वळतेच आता....
प्रमाण : २-३ माणसांसाठी
वेळ : १५-२० मिनिटे
साहित्य :
- पालक जुडी १/२ पेक्षा थोडी कमी
( पाने खुप नाजुन आणि छोटी असतील तर १/२ जुडी घ्या पण आजकाल पुण्यात मिळणारा पालक आळुशी स्पर्धा करत असल्याने फारच दांडगी पाने मिळतात )
- १/२ कांदा चिरुन
- ७-८ लसुण पाकळ्या
- १ कप दुध
- १ चमचा कणीक / कॉर्नफ्लोअर
- १ छोटी हिरवी मिरची
- मीठ, मिरीपुड चवीनुसार
कृती :
१. पालक पाने स्वच्छ धुवुन निथळुन घ्या. एका पसरट कढईत कांदा, ३-४ लसुण पाकळ्या आणि मिरची बुडतील एवढे पाणी घालुन शिजवायला ठेवा.
२. कांदा जरासा पारदर्शक झाला की त्यात पालक ची पाने हाताने तु़कडे करुन टाका.अजुन पाणी घालायची गरज नाही. पालकाला पाणी सुटेल.
३. पालक शिजला की गॅस बंद करा. (पालकाचे आकारमान एकदम कमी होउन कढईच्या तळाशी भाजीसारखे मिश्रण दिसु लागेल.तेव्हा झाला असं समजायचं )
४. मिश्रण जरा गार झाले की मिक्सर च्या भांड्यात काढुन घ्या आणि त्यात १ चमचा कणीक टाका.आणि बारीक पेस्ट करुन घ्या. छान गुळगुळीत पेस्ट झाली पाहिजे.
५. आता त्यात हळुहळु दुध घालुन एकजीव पेस्ट करुन घ्या.
६. हे मिश्रण पातेल्यात काढुन त्यात गरजेपुरत म्हणजे सुप जितकं पातळं हवं तितकं पाणी घालुन घ्या आणि चवीपुरते मीठ आणि मिरपुड घालुन एक उकळी काढा.
७. आता सगळ्यात चवदार भाग :
उरलेला ३-४ पाकळ्या लसुण एकदम बारीक चिरुन घ्या.
एका छोट्या कढल्यात १ चमचा तूप गरम करा आणि त्यात हा लसुण मस्त खरपूस तळुन घ्या आणि ही फोडणी सुपवर अगदी वाढायच्या वेळेस ओता...
तयार आहे गरमागरम (क्रीमशिवाय) क्रीम ऑफ पालक सुप ;-)
टीप :
१. डाएट साठी करताना शेवटची फोडणी वगळा.
२. मुलांना देताना यात ताजे घरचे लोणी कींवा चीज खिसुन टाका.
3.सुप मद्धे मीठ अगदी जपुन घाला कारण पालक अतिशय पटकन खारट होतो
Wednesday, May 27, 2015
केक पॉप्स
तेव्हा खास म्हणुन हा पदार्थ करुन बघितला...बच्चे भी खुश बच्चो की मम्मी भी खुश.
लेकीलाच मदतिला घेतलं...तिला पण खुप मज्जा आली करताना....
त्याची ही रेसिपी...
साहित्यः
बेसिक वॅनिला केक ( घरी केलेला किंवा विकतचा) मी ग्रीन बेकरी चा प्लम केक वापरला
मोर्डे कंपनीचे किंवा ईतर चॉकलेट बार ( मिल्क, व्हाईट, डार्क सगळे मिक्स )
पॉप स्टिक्स
डेकोरेशन चे साहित्य ( स्प्रिंकल्स, चॉकलेट शेविंग्ज, क्रश्ड नट्स)
कृती:
- प्रथम तयार केक चे तुकडे करुन मस्त चुरा करुन घ्या. हे लेकीने केले.तिला फार मज्जा आली.
- मावे मद्धे मिल्क आणि डार्क चॉकलेट विरघळुन घ्या आणि ते हळुहळु अंदाज घेत केक च्या चुर्यामद्धे मिसळा...गरज असेल तर थोडा दुधाचा हात लावुन घ्या....या मिश्रणाचे छोटे लाडु वळता आले पाहिजेत ईतपत घट्ट्/सैल करा
- आता या मिश्रणाचे छोटे छोटे लाडु वळुन घ्या आणि फ्रिज मद्धे ३० मि. साठी ठेवा ( फ्रिजर मद्धे नाही )
- तोवर आता दुसरीकडे ज्या रंगाचे पॉप्स बनवायचेत ते चॉकलेट वितळवुन घ्या.सजावटीचे सामान ई. तयार ठेवा.
- काही वेळाने यातील निम्मे गोळे/लाडु बाहेर काढा.वितळलेल्या चॉकलेट मद्धे पॉप स्टीक चे एक टोक बुडवुन घ्या आणि अलगद केक च्या लाडु मद्धे निम्म्यापर्यंत खुपसा..असे सगळे स्टीक करुन ते परत फ्रीज ला ठेवा...आणि उरलेले निम्मे बाहेर काढुन हीच कृती परत करा...असे केल्याने सगळे पॉपस व्यवस्थीत घट्ट राहतील नाहितर सगळ्या पॉपस ना स्टीक लावेपर्यंत सुरुवातीचे पॉप्स मऊ पडायला सुरुवात होईल.त्यामुळे बॅच प्रोसेसिंग महत्वाचे आहे :-)
- आता परत व्हाईट/मिल्क चॉकलेट वितळवुन घ्या.आधीची पॉप्स ची बॅच बाहेर काढुन घ्या. एक एक पॉप अलगद उचलुन चॉकलेट मद्धे घोळवा...जास्तीचे चॉकलेट बाउल च्या कडेवर अलगद टॅप करुन काढुन घ्या. आता लगेचच स्प्रिंकल्स इ इ त्यावर चिकटवा....हे लेकीने केले....:-)..तिच्यासाठी मस्त स्टार्स, हार्ट्स ई आणले होते मी...
- घरात थर्मोकॉल चा एखादा तुकडा असेल तर त्यात हे पॉप्स घुसवुन सुकायला ठेवा.
- अशाप्रकारे मस्त केक पॉपस बनवा आणि मस्त पार्टी करा...
टीप : पसारा बर्यापैकी होतो पण मजा पण येते करायला...पसारा आवरायला पोरांची मदत घ्या ;-)
माहितीचा स्त्रोत :
आंतरजाल
झटपट रवा डोसा..
१.१वाटी मैदा
२.१वाटी रवा
३.२ चमचे दही(नसले तरी चालते)
४.३-४ हिरव्या मिरच्या(किती तिखट पचवु शकता त्यानुसार
५.१-२ चमचे आलं-लसुण बारीक चिरलेला
६.भरपुर ताजा कढिपत्ता,बारीक चिरलेली कोथिंबीर
७.फोडणीचे साहित्य (जिरे,मोहरी,हिंग,हळद)
८.एक बारिक चिरलेला कांदा
९.मीठ
१०.१ चमचा साखर्(आवडत असल्यास)
रवा,मैदा,दही,मीठ,साखर आणि पाणी घालुन सारखे करावे आणि एक तास भिजवत ठेवावे...यात भरपुर पाणी लागते कारण रवा पाणी शोषुन घेतो...
ही फोडणी आता डोश्याच्या पिठात ओतावी,कांदा घालावा आणि व्यवस्थीत हलवुन घ्यावे...गरजेनुसार पाणी आणि मीठ घालावे...
शेवटी जे पीठ तयार होइल ते खुप पातळ (आमटीसारखे पळीसांड झाले पाहिजे)
पीठ पसरताना आधी कडेने घालत घालत मग मध्यापर्यंत यावे...मधे मधे भोके ठेवावीत्...तसेच तवा तापलेला असताना पीठ घालावे...
साहित्यः
शेंगदाणे मुठभर,२ पाकळी लसुण,२-४ लाल सुक्या मिरच्या,१ चिंचेचे बुटुक,मीठ्,साखर,
कॄती:
सर्व पदार्थ मिक्सरवरुन जरुरीप्रमाणे पाणी घालुन बारीक वाटणे...लाल मिरच्या नसल्यास लाल तिखट घालणे.
आवश्यक तेवढे पाणी घालुन सारखे करावे...
आंतरजाल

.jpg)












