काश्मीर डायरीज - 1
"आई आपण बर्फात कधी जायचं ?"
अगदी 5-6 वर्षांची असल्या पासून मधुजा प्रत्येक सुट्टी जवळ आली की आम्हाला म्हणायची.. एकदा अगदी सगळं ठरवता ठरवता काश्मीर ट्रिप फिसकटली होती..
त्यानंतर लांबतच गेली..
गेल्या 2 वर्षानंतर यावर्षी नक्कीच कुठेतरी मोठी ट्रिप काढू असं ठरलं आणि काश्मीर ला जायचंच असं म्हणून जानेवारी पासूनच "अभ्यास" सुरू केला
विमानाचे दर, ट्रॅव्हल कंपनी चे वेगवेगळे पर्याय बघायला सुरुवात केली....भाऊ-बहिणी, मित्र मंडळी सगळ्यांना हाक दिली..हो नाही करत आमच्या सहा जणांचे जायचे ठरले आणि आमचं विमान आणि KHAB travels तर्फे पॅकेज बुक करून झालं..
आता रोज रात्री डोळे मिटले की एकच स्वप्न डोळ्यासमोर दिसत होतं...
काश्मीर.. पृथ्वीवरचा स्वर्ग..
शॉपिंग,बॅग्स वगैरे वगैरे तयारी सुरू झाली.
आमची customized tour असणार होती त्यामुळे तिथे गेलं की कधी कसं फिरायचं ते आमचं आम्ही ठरवणार होतो..
वेगवेगळे ब्लॉग वाचून itinerary बनवली आणि ती 4 वेळा बदलून पण झाली..
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे बर्फ दिसणार होता त्या गुलमर्ग केबल कार ची तिकीट्स बुक केली..
पण इतकं सगळं साधं सोपं नसतं देवा...
काहीतरी गोंधळ झाल्याशिवाय प्रवासाला कसली मजा..
पहिला गोंधळ पुण्यातच सुरू झाला...
जायच्या काही दिवस आधी आमच्या विमान कंपनी चा मेसेज आला की जायच्या दिवशीची flight cancelled..
सगळं प्लॅंनिंग चा बँडबाजा... रात्री अपरात्री च्या flights नको होत्या म्हणून मुद्दाम दिवसाची flight ठरवली होती तर नेमकी तीच कॅन्सल..
मग कस्टमर केअर ला 10 वेळा फोन.. विमानाचे नवे पर्याय असं करत करत दूसरे विमान बुक झालं...
आणि..
14 मे 2022...
Finally... आम्ही उडायला तयार होतो..
No comments:
Post a Comment