प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
नवदुर्गा रांगोळ्या काढायचा नेम यावर्षी देवीनं पूर्ण करून घेतला. रोज सकाळी नेमानं या रांगोळ्या काढताना अतिशय आनंद मिळाला.मला रांगोळी काढताना नेहेमीच विचारविरहित अवस्था अनुभवायला मिळते. संपूर्ण लक्ष फक्त रंग आणि रेषांकडे एकवटलं जातं.एक प्रकारचं ध्यान म्हणता येईल.इंस्टाग्राम च्या एका अकाउंट वर मला या रांगोळ्या सापडल्या होत्या. या निमित्ताने देवीच्या वेगवेगळ्या रूपांचं महत्व वाचनात आलं. तिची आयुधं कोणती ? नावामागची कथा काय ? प्रत्येक देवीचे मंत्र हे सगळं रोज आवर्जून पाहिलं.आज नवव्या माळेला मनात ठरवलेला एक संकल्प देवीच्या आशीर्वादाने पूर्ण झाला.
चराचरात भरून राहिलेल्या या शक्तीचा आशीर्वाद असाच कायम सर्वांच्या पाठीशी राहो. 

देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्।
विद्यावंतं यशस्वंतं लक्ष्मीवंतं जनंकूरू।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥
- स्मिता श्रीपाद
नवरात्र 2023
No comments:
Post a Comment