Tuesday, July 22, 2025

Just 40 :-)

 आजचा दिवस उजाडला आणि Whatsapp, Facebook, Instagram वर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सुरु झाल्या.माझ्या स्मार्टफोन च्या चाणाक्ष AI(Artificial Intelligence) ला नेमकं कळलं की आज माझा 40 वा वाढदिवस. मग काय... फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे दणादण फीड सुरु झाले

"40 is new 20” किंवा "You are not 40 you are 18 with 22 years of experience” किंवा "Joy begins at 40” वगैरे वगैरे असे पोस्ट मला आपोआप दिसायला लागले😜.... माझ्या चाळीशी ची चर्चा आणि चिंता माझ्यापेक्षा जास्त AI ला होती त्यामुळे तो/ती आपला इमाने इतबारे माझ्या so called दुःखावर फुंकर मारायचा आटोकाट प्रयत्न करत होता 😜.
काय गम्मत असते ना...आपला work resume बनवताना अनुभव सांगण्याची चढाओढ चाललेली असते. Years of experience तिथे अत्यंत महत्वाचा असतो. मग वाढदिवस म्हणजे खरंतर आयुष्याचा resume (फारच दवणीय शब्द झाला 😜) , पण इथे अनुभव लपवायचा आटापिटा.
खरंतर अजून एक सुंदर वर्ष गाठीशी जोडलं गेलं. अनेक नवीन अनुभव मिळाले म्हणून अभिमानानं मिरवायचा आकडा. कडू गोड आठवणींचा साठा अजून वाढला म्हणून मिरवायचं आणि सगळ्यात महत्वाची मिरवण्यासारखी गोष्ट म्हणजे नवीन भेटलेले सुहृद, नवीन जोडलेली नाती आणि जुन्या नात्यांची अजूनच घट्ट झालेली वीण.
आज शुभेच्छा देताना मैत्रिणी म्हणाल्या की लिहिती राहा आणि एक मैत्रीण तर म्हणाली की आता रिटर्न गिफ्ट म्हणून काहीतरी लिही. ही अशी प्रोत्साहन देणारी माझी माणसं वयाच्या प्रत्येक वळणावर भेटणार असतील तर 40 काय ...कितीका वाढेना वय... वाढू देत की... 😀
फक्त प्रत्येक वाढत्या वर्षासोबत प्रगल्भता वाढू देत आणि पाय जमिनीवर राहू देत एवढीच महाराजांना मनापासून प्रार्थना 🙏🏻.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा आजचा दिवस आनंदात गेला. असाच लोभ राहो. 🤗🧿
खूप खूप प्रेम ❤️
-©️स्मिता श्रीपाद
4 ऑगस्ट 2023

No comments:

Post a Comment