शाळा सुरू.. डब्बा सुरू..प्रयोग सुरू
अधून मधून मला आदर्श आई बनायची हुक्की येते.
मग त्या आठवड्यात अचानक ब्रेड, मैदा ,जंक फूड बंद, भाज्या खा,सॅलड खा, फळं खा असा फतवा मी काढत असते. शक्यतो अशी हुक्की शाळा सुरू झाली की पाहिले 2 आठवडे टिकते.
मग मधुजा आणि मी दोघीपण वैतागतो आणि परत ये रे माझ्या मागल्या.


तर सध्या नुकतच शाळा सुरू झाल्यामुळे आदर्श आई चा अटॅक आलाय.चित्रात दिसेल असा सुंदर healthy and tasty डबा द्यायचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आज केलेला प्रयोग..
*रागी व्होलव्हीट मफीन्स*
*साहित्य* -
नाचणी पीठ 1 वाटी
(सुट्टी मध्ये वजन कमी करायचा किडा आलेला अंगात म्हणून भरपूर नाचणी चं पीठ आणलं होतं)
गहू पीठ 1 वाटी
पिठीसाखर 1.5 -2 वाटी
बेकिंग पावडर 1/2 चमचा
बेकिंग सोडा 1/4 चमचा
दही 1/2 वाटी
दूध 1.25 वाटी
तूप 4 चमचे
व्हॅनिला इसेन्स - 1/2 चमचा
कोको पावडर - 2 चमचे
डार्क चॉकलेट चे तुकडे
(चमचा म्हणजे आपला साधा पोह्याचा चमचा आणि वाटी म्हणजे मध्यम आकाराची आमटीची वाटी वापरली)
कृती -
ओव्हन 200℃ ला convection मोड ला प्री-हिट करायला लावायचा.
दोन्ही पिठं, बेकिंग पावडर आणि सोडा 2 वेळा चाळून घ्यायचं
तूप,साखर,दही,दूध एकत्र चांगलं फेटून घ्यायचं
त्यात चाळलेलं मिश्रण घालून हलक्या हाताने एकत्र करायचं.चॉकलेट तुकडे आणि व्हॅनिला इसेन्स शेवटी घालून अलगद मिक्स करायचं
मफिन च्या मोल्ड मध्ये घालून ओव्हन मध्ये 15 मिनिटे बेक करायचं
No comments:
Post a Comment