Dear Hemangi Chaudhary , this is my farewell gift to you...


घरातली सगळी गडबड उरकून ऑफिस मध्ये पोचलं की तुम्ही सगळ्यात आधी काय करता ? (कोरोनापूर्व काळातला प्रश्ण )
डेस्क वर जाता, डेस्कटॉप/लॅपटॉप चालू करता , pantry मधून पाण्याची बाटली भरून आणता आणि मेल्स चेक करता.. मग वेळ मिळाला की कॉफी ब्रेक वगैरे.. बरोबर ना ?
ती ऑफिसमध्ये पोचली की आधी थेट रेस्ट रूम गाठते.. तिथला १० फुटाचा भिंतभर आरसा तिची वाट बघत असतो.. मग आपला स्पेशल पाऊच उघडते आणि छानपैकी तिच्या भाषेत "तयार होते"... मनासारखं सगळं जमलं की मग पुढे काम....ती म्हणजे आमची *हेमांगी.. *हेम*...
हेम आणि माझी ओळख होऊन आता साधारण 9 वर्ष झाली ... मला अजूनही पहिल्यांदा ती भेटली तो दिवस आठवतोय.. मला persistent जॉईन करून साधारण 15 दिवस वगैरे झाले असतील.आल्या दिवसापासून नूर च्या सोबत तिच्या लंच ग्रुप मध्ये जायला मी सुरू केले होते.. अमृता, गीतांजली, विजयश्री, अर्चना, किरण...सगळ्यांशी हळूहळू ओळख होत होती. गप्पा मध्ये हेम असायचीच असायची.. कोण ही हेम अशी उत्सुकता होती मनात.. त्यावेळी ती onsite ला गेली होती. एक दिवस लंच चालु असताना एक हसर्या चेहेर्याची एकदम टकाटक कपड्यातली मुलगी मध्येच येऊन आम्हाला जॉईन झाली.. तिच्या येण्याने सगळ्या एकदम खुश झाल्या.. हीच ती हेम....आधीच हा ग्रुप एकदम happening त्यात आणि हेम आल्यावर दंगा च सुरू झाला.. माझी आणि तिची कोणीतरी ओळख करून दिली.. मला आवडलीच ती एकदम पहिल्या भेटीत.. तिने सगळ्यांसाठी गिफ्टस आणलेल्या आणि माझ्या पहिल्या भेटीत सुद्धा अनेक वर्षांची ओळख असल्यासारखे मला पण एक मस्त डेस्क वर ठेवायचा होल्डर आणि चॉकलेट्स दिले तिने.....
जेवण झाल्यावर आम्ही खुप गप्पा मारल्या आणि त्याक्षणी एकदम जाणवलं की काहीतरी वेगळच ट्युनिंग जमलय आपलं हिच्याशी.....
तेरा मुझसे है पेहेले का नाता कोई..
युही नही दिल लुभाता कोई....
असं फिल्मी च एकदम 

रोज ऑफिस ला जायची ओढ लागायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इथे मला मिळालेला ग्रुप. सगळ्या जणी एकसे बढकर एक वल्ली आहेत...."व्यक्ती आणि वल्ली" चं अजुन एक व्हर्जन पुलं ना नक्की काढता आलं असतं...जर ते आम्हा सगळ्याना भेटले असते तर... आणि या सगळ्या जणींना बांधुन ठेवणारा एक महत्वाचा धागा म्हणजे आमची हेम.माझा हा ग्रुप मला खुप जास्त जीवाभावाचा आहेच पण तरीसुद्धा एक कणभर जास्त प्रेम हेम वर आहे

VJ च्या भाषेत "लाडकी मैत्रीण" 

त्याचं खास असं कारण नाही सांगता येणार.पण हेम सोबत मनातलं कोणतही सीक्रेट शेअर करताना काहीही संकोच वाटत नाही हे ही खरं.
हेम म्हणजे एकाचवेळी practical person आणि sensitive girl असं एक मिश्रण आहे. तिचं स्वतः च असं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि त्याचे धडे ती वेळोवेळी आम्हाला देत असतेच. कधीकधी विनाकारण भावनेच्या भरात वाहुन जाणार्या आमच्या ग्रूप मधल्या माझ्यासकट काही काही मुलींसाठी हेम चे धडे नेहेमी उपयोगी पडतात.स्वतः साठी Me Time कसा काढायचा हे हेम कडे बघुन शिकु शकता तुम्ही.तिचे फंडे एकदम क्लीअर असतात.आपण दिवसभर ऑफिसमधे इतकं काम करतो तर घरी गेल्यावर आपल्याला पण आराम मिळालाच पहिजे. मग घरची कामं outsource करण्यात काहीच चुकिचं नाही.हेम च्या या परफेक्ट time management मुळेच ऑफिस सांभाळता सांभाळता ती तिचे सगळे छंद मस्त जोपासत असते. गेल्या काही दिवसात तिने योगा टिचर म्हणून पण कोर्स पूर्ण केला आणि आता योगा गुरू झाल्या आहेत मॅडम 

हेम एकदम स्पष्टवक्ती आहे.जे आहे ते तोंडावर. पोटात एक आणि ओठावर दुसरं असं काही तिला कधी जमत नाही. आणि हे फक्त मैत्रिणींसाठी नाही बरका. अगदी घरचे लोक सासु, सासरे, नवरा, आई , वडील सगळ्यांच्या बाततीत. मुली म्हणलं की टिपिकल घरगुती सासु-सुन गप्पा पण रंगतातच. या गप्पांमधे मला नेहेमी हेम आणि तिच्या सासु बाईंमधलं नातं खुप आवडतं. राग आला तरी मनात कुढत न बसता स्पष्ट्पणे दोघी व्यक्त होतात आणि जे झालं ते विसरुन पुढे जातात. हे नातं मला खरच खुप healthy वाटतं. राग, दु:ख अशी ओझी वर्षानुवर्षे मनात सांभाळण्यात काय अर्थ आहे ना.
हेम ची अजुन ची अजुन एक खास गोष्ट म्हणजे, आपल्या मैत्रिणींचे कौतुक करणे आणि त्यांना motivate करणे.कितीही छोट्यात छोटी गोष्ट असुदेत इतकं कौतुक करेल ना की बस.साधा वरण भात जरी डब्यात आणला तरी त्याचं पण कौतुक 

हेम अत्यंत organized मुलगी आहे. तिच्या ऑफिस च्या कामात ते दिसतच पण तीच घर कधी बघायला गेलात तरी आपल्याला complex येइल इतकं छान नीटनेटकं असतं. हेम चा जुना 1 BHK फ्लॅट असताना मी एकदा तिच्याकडे गेले होते. इतका छोटासा फ्लॅट आणि घरात इतकी माणसं असुनही तिने तो इतका छान ठेवला होता ना. मला फार फार कौतुक वाटलं तिचं कारण मी एक बर्यापैकी अव्यवस्थित मुलगी आहे 

कुठल्याही गोष्टीत पॉसिटीव्ह साइड शोधायची सवय मला आमच्या या लंच ग्रुप मधे लागली असं म्हणता येइल. नळ स्टॉप वरुन माझा प्रोजेक्ट भगीरथ ऑफिस ला शिफ्ट झाला आणि मला प्रचंड वाईट वाटायला लागलं की आता या पोरी रोज भेटणार नाहीत म्हणुन. तेव्हा हेम, किरण यांनी मला समजावलं की भगीरथ ऑफिस किती सुंदर आहे आणि तिथे काम करायला किती मजा येते वगैरे. आणि तसचं झालं. पुढची दोन वर्षे इतकी सुरेख गेली ना की बस...मी जेव्हा परत पीटी ला आले तोवर जुना लंच ग्रुप सगळा विखुरला होता. हेम एकटीच होती आणि सोबत होती नवीन गँग...वैशु, किरण, रामेश्वरी आणि माधुरी. मुली बदलल्या पण सगळी मजा तीच होती.त्यात आम्हाला अर्चना आणि दीपाली येउन जॉइन झाल्या आणि परत धमाल सुरु झाली. साधारण एकाच स्वभावाचे आणि तत्वांचे लोक अपोआप एकमेकांकडे ओढले जातात अस असावं बहुतेक कारण हा ग्रुप सुद्धा कधी जीवाभावाचा झाला कळलंच नाही. आणि इथे पण सगळ्यांना बांधुन ठेवणारा एक धागा होताच ना हेम नावाचा 

आणि आता हे सगळं असं चांगलं चालु असताना हेम persistent सोडुन जाणार म्हणतेय 

वाइटातलं चांगलं इतकच आहे की सध्या घरात बसुन काम करत आहोत त्यामुळे हेम चं रोज न भेटणं त्रास देणार नाहिये. पण आता जेव्हा ऑफिस सुरु होइल तेव्हा लंच ला हेम भेटणार नाही ही कल्पना अजुनही त्रास देतेय.
प्रिय हेम,
हे सगळे तुझ्या १५ वर्ष सत्कार वाल्या भाषणात बोलायचे मुद्दे होते. 

पण असो...
"Change is the only permanent thing in the world"
त्यामुळे हा बदल अपरीहार्य आहे हे माहित आहे. पण एक खात्री आहे. गेल्या ९ वर्षात जुळलेल मैत्रीचे हे धागे खुप चिवट आहेत.आणि अशा छोट्याशा बदलांमुळे त्यावर काही परीणाम होउ शकत नाहिये.
whatsapp, व्हिडीओ कॉल वर सतत भेट्णार आहोतच आपण आणि तुझं घर माझ्यासाठी १० मिनिटाच्या अंतरावर आहे हे एक महत्वाचं.
Wish you all the best dear for your new job and new role..
I know you will rock as always...



नवीन ऑफिस मधे काही वर्ष काढ आणी *पर्सी* ला परत ये. आपल्याला एकत्र रीटायर व्हायचंय 

तोवर....keep in touch
Love you to the moon and back
( असं म्हणायची पद्धत आहे
)

No comments:
Post a Comment